Home स्पोर्ट्स सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

1 second read
0
0
102

no images were found

सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर  :- महालक्ष्मी हॉस्पिटल कोल्हापूर पुरस्कृत सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज पद्माराजे गर्लस् हायस्कूल मधील कै.लतादेवी अनिल लोहिया चेस अकॅडमी मध्ये उत्साहात सुरू झाल्या.
स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणाऱ्या या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत ७६ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व दोशी हॉस्पिटलचे डॉक्टर रिषी दोशी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्रीकांत चव्हाण, सयाजी पाटील,निकिता दोशी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे व रवी आंबेकर,अमित दिवाण,अर्पिता दिवाण उपस्थित होते.
आज झालेल्या मुलांच्या गटात चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर द्वितीय मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील व तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.चौथा मानांकित कोल्हापूरचा यश भागवत साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील या जुळ्या बहिणी अडीच गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.तृतीय मानांकित नांदणीची सिद्धी बुबणे, चतुर्थ मानांकित नांदणीची संस्कृती सुतार, पाचवी मानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे, जुई चोरगे, वेदिका मदने व वृद्धी गायकवाड या सहा जणी दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…