Home आरोग्य नेत्र चिकित्सा आणि वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत – हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे 

नेत्र चिकित्सा आणि वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत – हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे 

1 second read
0
0
60

no images were found

नेत्र चिकित्सा आणि वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत – हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे 

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : सलग दीड तपा हून अधिक काळाच्या कालावधीत चार ही पिढीतील मुंबई – सीमाभागा पासून बांधापर्यंतच्या विविध आरोग्य शिबिरात आणि वैद्यकीय उपक्रमात डोळे तपासून योग्य उपचार करण्यासह वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातही ठसा उमटवलेले डॉ . विरेंद्र वणकुद्रे यांचे कौशल्य हे नक्कीच कौतुकास्पद आणि आदर्शवत असल्याचे प्रतिपादन हत्यस्पर्श परिवाराचे संस्थापक पदमाकर कापसे यांनी केले . डॉक्टर वणकुंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात शिवाजी उद्यम नगर येथील पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये आयोजित स्नेह मेळाव्या त त्यांनी हे हितगुजवर मनोगत व्यक्त केले . पंत वालावकर हॉस्पिटल पासून ते सिद्धगिरी कणेरी मठ हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने त्यांना विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते यामधूनच त्यांच्या कार्याचे मोल अधोरेखित होते भविष्यातही त्यांचे काम असेच सोपे वाढत जाऊ दे अशा शब्दात माईड मंत्राचे समुपदेशक विजय खाडे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या . प्रारंभी सर्वांचे स्वागत आरोग्य मित्र पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी केले करत ‘ मे बर्थ डे क्लब तर्फे सामूहिक रित्या या महिनाअखेरीस व्यापक प्रमाणात नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगून मे महिन्यामध्ये रक्त टंचाई असल्याने अधिकाधिक लोकांनी या शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले . यावेळी डॉक्टर किरण पाटील , डॉ . वेदांतिका पाटील यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या .यावेळी ई सिटी न्युज संपादक सागर ठाणेकर , साई पुढारी बावडा टाईम्सचे किरण शेलार, सुनीता रोटे ,कांचन धनवडे तसेच पॅकिंग उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संतोष वणकुद्रे यांच्यासह वैद्यकीय कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .या दरम्यान प्रवासात असलेले संतोष कुलकर्णी , जैन संघटनेचे राजेंद्र पाटील , क्रिडा संघटक काका पाटील , . भाजपा उद्योग सेलचे पांजरपोळ येथील उद्योजक फिरोज मुजावर , शाहू मिल कॉलनीचे राजेंद्र गायकवाड , रोटरी क्लबच्या वारणा वडगांवकर जितेंद्र पवार यांनीही भ्रमणध्वनीवरून वणकुद्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …