Home Uncategorized डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी न्याय विभागाचा अभिप्राय मागवा  –  चंद्रकांत पाटील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी न्याय विभागाचा अभिप्राय मागवा  –  चंद्रकांत पाटील

28 second read
0
0
105

no images were found

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी न्याय विभागाचा अभिप्राय मागवा  –  चंद्रकांत पाटील

        मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन विद्यापीठांकडील प्राध्यापकांच्या वेतनाविषयी विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागवावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

            या दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापकांना कन्हेरे, कदम समितीनुसार वेतन देण्याच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात आज मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, यांच्यासह दोन्ही विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांना 5 व्या वेतन आयोगानुसार वेतन देत असल्याचा मुद्दा सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. हा वेतनातील दुजाभाव योग्य नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थानिक निवड मंडळाने निवड केलेल्या उमेदवारांविषयी विद्यापीठाने निर्णय घ्यावयाचा आहे. त्यानुसार विद्यापीठांनी निर्णय घ्यावा. तसेच या प्राध्यापकांना वेतन देण्याविषयी विधी न्याय विभागाला सविस्तर व सकारात्मक माहिती सादर करुन अभिप्राय मागवावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार कसबा बावडा (प्रतिनिधी):- येथील…