Home सामाजिक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

2 second read
0
0
100

no images were found

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

 

कोल्हापूर : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त निगम यांच्याकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणा-या निधीतून शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज, सुक्ष्म पतपुरवठा कर्ज अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. सद्यस्थितीत शैक्षणिक कर्ज ही एकमेव योजना सुरु असून उर्वरीत योजना पुढील आदेश येईपर्यत बंद राहतील. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योजना महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. पण सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यासारख्या प्रसार माध्यमांवर महामंडळामार्फत शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, डिलिव्हरी बॉय, वाहन कर्ज यासाठी नवीन योजना सुरु करण्यात आल्या असल्याबाबतच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. या अफवांद्वारे समाजातील नागरिकांची आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांपासुन व आर्थिक फसवणुकीपासून सावधान रहावे. तसेच जर कोणी आपली आर्थिक फसवणुक करत असल्यास संबधित व्यक्तीविरुध्द स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, जेणेकरुन आपली व इतर नागरिकांची फसवणूक होणार नाही, असे आवाहन मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू कोल्हापूर,: छत्रपती शाहू महाराज …