no images were found
महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतील त्या ठिकाणी ‘जोडे मारो’ आंदोलन :- भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
मुंबई :- उद्धव ठाकरे नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांना कलंकित म्हणत आहे. तुम्हाला नागपूरची जनता जोड्यानं मारेल. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतील त्या ठिकाणी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व आपण सगळ्यांनी बघितलं आहे. कोरोना काळामध्ये महाराष्ट्राला अंधारात ठेवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
‘सत्तेत आल्यावर मराठा समाजाचं आरक्षण घालवणारा माणूस म्हणजे कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जपण्यासाठी मरमर काम करतात. मात्र, हा कलंकित करंटा (उद्धव ठाकरे) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना साथ देतो,’असही ते यावेळी बोलताना म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘जनतेशी बेइमानी करून, मुख्यमंत्री पदाचा अयशस्वी प्रवास म्हणजे उद्धव ठाकरे. त्यांचा अयशस्वी प्रवास महाराष्ट्राच्या जनतेनं बघितला आहे. कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अहंकारासाठी अनेक योजना बंद पडल्या आहे. उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्प, शेतकरी योजना इत्यादी गोष्टी बंद पडल्या.’