
no images were found
कपडे काढून रस्त्यावर दगड मारत फिरतील; शिंदे गटानं संजय राऊतावर साधला निशाणा
मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यानं संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्याच दिवसात कपडे काढून रस्त्यावर दगड मारत फिरतील. संजय राऊत यांच्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी’. असं मस्के यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी देखील त्यांनी संजय शिरसाट यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशीच कृती केली होती. यावरून आता शिंदे गटानं संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊत हे नेहमीच शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत असतात. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात एक प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी संजय राऊतांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली.