Home सामाजिक बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा  – संजयसिंह चव्हाण

बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा  – संजयसिंह चव्हाण

16 second read
0
0
105

no images were found

बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा  – संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर: जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.

              नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प जिल्हास्तरीय कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

              श्री. चव्हाण म्हणाले, बचत गटातील महिलांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करावे. ऊसाबरोबरच अन्य पिकांच्या रोपवाटिका निर्मितीवरही भर द्यावा. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, लैंगिक छळ प्रतिबंध कायदा अशा महिलांशी संबंधित विविध कायद्यांबाबत बचत गटातील महिलांमध्ये जागृतता करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील 6 लोकसंचलित साधन केंद्रामधील 112 गावातील  महिला बचत गटांमधील महिलांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करुन याद्वारे महिलांपर्यंत महत्वपूर्ण व आवश्यक माहिती पोहोचवावी, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 

           

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…