Home सामाजिक राष्ट्रीय माहितीपट महोत्सवाचे शिवाजी विद्यापीठात आयोजन

राष्ट्रीय माहितीपट महोत्सवाचे शिवाजी विद्यापीठात आयोजन

14 second read
0
0
48

no images were found

राष्ट्रीय माहितीपट महोत्सवाचे शिवाजी विद्यापीठात आयोजन

कोल्हापूर –राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष महोत्सव 2022-23 निमित्त शिवाजी
विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम तसेच उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग
म्हणून विद्यापीठाच्या जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या वतीने "राजर्षी छत्रपती
शाहू महाराज राष्ट्रीय माहितीपट महोत्सव" चे आयोजन केले आहे. या महोत्सवात महाविद्यालयीन,
विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी सहभाग घेवू शकतील. हा महोत्सव दिनांक २७-२८ एप्रिल रोजी
विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात होणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला नोंदणी अर्ज, महाविद्यालयाचे ना-हरकत
प्रमाणपत्र तसेच मेल ड्राईव्हच्या माध्यमातून माहितीपटाची क्लिप journalism@unishivaji.ac.in या
मेल आय डी वर दि. 17 एप्रिल सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पाठवणे बंधनकारक आहे. महोत्सवात
प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक असून प्रवेश नि:शुल्क आहे. महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना,
सुचविलेले विषय, नियम, अटी तसेच नोंदणी अर्ज नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर
http://www.unishivaji.ac.in उपलब्ध आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय तसेच स्पेशल ज्युरी,
बेस्ट सिनेमेटोग्राफी, बेस्ट एडिटिंग , बेस्ट साउंड अशा स्वरुपाची पारितोषिके तसेच शिवाजी विद्यापीठाचे
सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महोत्सवासाठी सहभाग घेणाऱ्या र्विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास
आणि इतर खर्च स्वतः करावयाचा आहे.
अधिक माहितीसाठी या महोत्सवाच्या सह-समन्वयक डॉ. सुमेधा साळुंखे आणि परशराम पवार
काम पाहत असून यांच्याशी विभागाच्या journalism@unishivaji.ac.in या मेल आय डी वर संपर्क
साधता येऊ शकेल. या माहितीपट महोत्सवाच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती
महोत्सव पर्वात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन महोत्सवाच्या संयोजक, जर्नालिझम
आणि मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली &nbs…