Home राजकीय शिवसेना कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी उद्या जाहीर होणार : क्षीरसागर

शिवसेना कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी उद्या जाहीर होणार : क्षीरसागर

0 second read
0
0
247

no images were found

शिवसेना कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी उद्या जाहीर होणार : क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाकार्यकारणी उद्या दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर दिली आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेवून आम्ही काम करत असून, जिल्हा पातळीवर शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये  जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तर शहर पातळीवर शहरप्रमुख, महिला आघाडी शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यातील शिवसेना जिल्हाप्रमुख या पदावरील नियुक्ती उद्या  दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता शिवालय, शिवसेना शहर कार्यालय, कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेद्वारे या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…