Home राजकीय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम

0 second read
0
0
144

no images were found

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत कोर्टाने सीबीआयने दाखल केलेले जामीनाविरोधातील अपील फेटाळून लावले आहे.
मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज नोव्हेंबर २०२२ मध्ये फेटाळला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. येथे देशमुखांना जामीन मिळाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी फेटाळून लावली आहे.
१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. सुमारे ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले. नोव्हेंबर २०२१ पासून देशमुख तुरुंगात होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…