Home सामाजिक कोल्हापुरात १४ आणि १५ जानेवारी रोजी डॉग शो होणार

कोल्हापुरात १४ आणि १५ जानेवारी रोजी डॉग शो होणार

1 second read
0
0
292

no images were found

कोल्हापुरात १४ आणि १५ जानेवारी रोजी डॉग शो होणार

कोल्हापूर :  कोल्हापुरात नुकतीच UKC क्लबकडून केनेल असोसिएशन कोल्हापूर या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशन च्या माध्यमातून कोल्हापुरात दिनांक १४ आणि १५ जानेवारी दरम्यान डॉग शो आयोजित करण्यात आला आहे.
तब्बल तीन वर्षांनंतर कोल्हापुरात डॉग शो होत असल्याने श्वान प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या शो मध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी होत असून जातिवंत श्वान पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. कोल्हापुरातील खराडे कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या या डॉग शो मध्ये जर्मन शेफर्ड, रॉटविलर, बिगल, पग आदी अनेक जातिवंत श्वानांचा समावेश आहे. कोल्हापुरातील श्वान प्रेमींनी या डॉग शोला उपस्थित राहून आनंद लुटावा असे आवाहन केनेल असोसिएशन कोल्हापूर चे अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष अजित हरणे, सेक्रेटरी सौरभ तेंडुलकर, खजानीस मकरंद पाटगावकर यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…