प्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख तथा ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त येत्या रविवारी (दि. ११) सकाळी १०.३० वाजता येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. जगन कराडे गौरव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. आनंद कुमार यांच्या …