Home Uncategorized महापौर रूपाराणी निकम यांच्या नूतन दालनात लावण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामाची प्रतिमा भेट !

महापौर रूपाराणी निकम यांच्या नूतन दालनात लावण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामाची प्रतिमा भेट !

1 second read
0
0
9

no images were found

महापौर रूपाराणी निकम यांच्या नूतन दालनात लावण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामाची प्रतिमा भेट !

कोल्हापूर – ऑगस्ट मासात झालेल्या महापौर जनता दरबारात महापौरांनी त्यांचा भाषणाचा प्रारंभ ‘जय श्रीराम’ म्हणून केल्यावर त्याला एका व्यक् तीने आक्षेप घेतला होता. या व्यक्तीला कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी सडेतोड आणि आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. त्याविषयी विशेष अभिनंदन करत हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महापौरांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनात लावण्यासाठी ‘श्रीरामा’ची भव्य प्रतिमा दिली. या प्रसंगी महापौरांचे पती श्री. संग्रामसिंह निकम हेही उपस्थित होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे साधक श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास जाधव, महिला आघाडीच्या शीला माने, हिंदू जागरणच्या डॉ. अश्‍विनी माळकर उपस्थित होत्या. या प्रसंगी सर्वांनी ‘जय श्रीराम’च्या जोरदार घोषणा दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्यात यावी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्यात यावी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे कोल्हा…