Home राजकीय अमेरिकेच्या अन्यायकारक करवृद्धीविरोधात भर पावसात कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन !

अमेरिकेच्या अन्यायकारक करवृद्धीविरोधात भर पावसात कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन !

1 min read
0
0
141

no images were found

      

  

अमेरिकेच्या अन्यायकारक करवृद्धीविरोधात भर पावसात कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन !

कोल्हापूर(प्रतिनिधी ):- अमेरिकेने भारतीय मालावर ५० % इतका अन्यायकारक कर लादल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील विविध संघटनांनी ‘मॅकडोनाल्ड्स्’ समोर (हॉटेल सयाजी शेजारी) निदर्शने करत अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी वापरलेल्या ‘स्वदेशी’च्या शस्राचा पुन्हा एकदा वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले.

या प्रसंगी ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ह.भ.प. महादेव यादव महाराज, आरोग्य भारतीच्या डॉ. अश्‍विनी माळकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे करवीर तालुका समन्वयक श्री. शरद माळी, युवासेनेचे श्री. सागर पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. 

      या आंदोलनासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महिंद्र अहिरे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. विजय पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कागल तालुका संयोजक श्री. किरण कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिलीप दळवी, मनोज चौगुले, संभाजी थोरवे, सतीश पाटील, युवा सेनेचे श्री. सचिन नागटिळक, सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे, उद्योजक श्री. आनंद पाटील, शिवसेनेचे श्री. बाळासाहेब नलवडे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले. 

       या अन्यायाला उत्तर म्हणून मॅकडोनाल्ड्स (McDonald’s) , केएफसी (KFC) , बर्गर किंग (Burger King),  पिझ्झा हट (Pizza Hut) , डॉमिनोज (Domino’s)  स्टारबक्स (Starbucks) , डंकिन डोनट्स (Dunkin’ Donuts),सेव्हन अप (7UP), कोका-कोला (Coca-Cola), स्प्राईट (Sprite),, फॅन्टा (Fanta), लेज (Lay’s), अ‍ॅमेझॉन (Amazon) , उबेर (Uber) , नेटफ्लिक्स ((Netflix)  कोलगेट (Colgate), पामोलिव्ह (Palmolive),जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) यांसारख्या अनेक प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. अमेरिकन वस्तूंचा त्याग करून त्याऐवजी देशी वस्तूंचा अभिमानाने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     हिंदु जनजागृती समिती आणि अन्य सहभागी संघटनांच्या वतीने म्हटले आहे की, रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण पुढे करून अमेरिकेने भारताच्या उद्योग-धंद्यांवर, शेतकर्‍यांवर आणि अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला आहे. एकीकडे भारतापेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी करणार्‍या चीनवर कोणताही कर लावला जात नाही, तर दुसरीकडे अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम आणि पॅलेडियमसारख्या वस्तूंची खरेदी करत आहे. यावरून हा निर्णय केवळ भारताला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठीच घेतला असल्याचे स्पष्ट होते, असे या संघटनांचे म्हणणे आहे.

     या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यामध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता हा अन्यायकारक कर तात्काळ मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणावा. या निर्णयामुळे नुकसान झालेल्या भारतीय उद्योगांना, साहाय्य करावे. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला अधिक गती देऊन भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे. जर अमेरिकेने कर मागे घेतला नाही, तर भारतात व्यवसाय करणार्‍या अमेरिकन कंपन्यांवर ५० % प्रति-कर लावावा.

                                                  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…