Oplus_131072
no images were found
शिवाजी विद्यापीठात सद्भावना दिन शपथ
कोल्हापूर, (प्रतिनिधी ):- शिवाजी विद्यापीठात आज शांती व अहिंसा यांची शपथ घेत सद्भावना दिन साजरा करण्यात आला.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र .कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.अरविंद मडावी यांनी सर्व उपस्थितांना सद्भावना शपथ दिली. यावेळी क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, डॉ.प्रशांत पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.