no images were found
कलाकार प्लास्टिक पिशव्या–मुक्त जीवनासाठी सांगत आहेत त्यांचे पर्यावरणपूरक उपाय!
इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे निमित्त कलाकार साध्या पण प्रभावी सवयी स्वीकारून पर्यावरण-जागरूक जीवन जगण्यास प्रेरित करत आहेत. जुन्या कपड्यांना ट्रेंडी शॉपिंग टोट्समध्ये बदलण्यापासून त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत तागाच्या आणि कापडी पिशव्या समाविष्ट करण्यापर्यंत ते सिद्ध करत आहेत की, शाश्वतता सहज आणि स्टायलिश असू शकते. किराणा दुकानात खरेदी करणे असो किंवा विमानतळावरावर जायचे असो त्यांच्या जाणीवपूर्वक निवड महत्वपूर्ण संदेश देतात की, लहान पुढाकार देखील मोठा प्रभाव निर्माण करू शकतात. एण्ड टीव्हीवरील कलाकार देखील त्यांच्या सर्जनशील प्लास्टिक-मुक्त जीवनशैली उपायांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’). कटोरी अम्माची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “मी नेहमी वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करते. घरामध्ये मी मैत्रिणीच्या मदतीने माझ्या जुन्या साड्या व दुपट्टांपासून आकर्षक व मजबूत शॉपिंग बॅग्ज बनवल्या आहेत. या कापडी पिशव्या टिकाऊ व आकर्षक असण्यासोबत त्यामध्ये भावनिकता सामावलेली आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला गतकाळातील सुरेख क्षणांची आठवण येते. मी माझ्या कारमध्ये नेहमी तागाची पिशवी ठेवते, ज्यामुळे मला प्लास्टिक पिशवीचा वापर करावा लागत नाही. सेटवर देखील मी पुन्हा वापर करण्यायोग्य पिशव्या घेऊन येत आदर्श स्थापित करते आणि अनेकदा तरूण कलाकारांसोबत शाश्वत निवडी करण्याबाबत चर्चा करते. यंदा इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे निमित्त मी सर्वांना आपल्या पारंपारिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करते. आपल्या आई व आजी यासंदर्भात आग्रही होत्या, ज्या ट्रेंड होण्यापूर्वीच कापडी पिशव्यांचा वापर करायच्या. चला, अभिमानाने, सर्जनशीलतेसह आणि जुन्या आठवणींना उजाळा देत तो ट्रेंड पुन्हा आणूया. शाश्वतता फक्त गरज नाही तर जीवनशैली निवड आहे, जी आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते.”
अंगूरी भाबीची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय शुभांगी अत्रे म्हणाल्या, “लहानपणी मी माझ्या आईला बाजारात सुरेखरित्या शिवलेल्या कापडी पिशव्या घेऊन जाताना पाहायचे, ज्याचा माझ्यावर दीर्घकालीन प्रभाव पडला. आज, मी जाणीवपूर्वक प्लास्टिकचा वापर करणे टाळते. मी जुन्या डेनिम, साड्या व स्कार्फपासून फॅशनेबल कापडी पिशव्या बनवल्या आहेत, ज्यांचा मी दररोज वापर करते. मी माझ्या हँडबॅगमध्ये फोल्ड होणारी तागाची पिशवी देखील ठेवते. ही पिशवी स्टायलिश, सोईस्कर असण्यासोबत नेहमी उपयुक्त ठरते. मी माझ्या मैत्रिणींना व कुटुंबांना देखील त्यांच्या पिशव्या तयार व आकर्षक करण्यास प्रेरित करते. तसेच हँडबॅग्ज, पर्सची खरेदी करताना मी पर्यावरणपूरक ब्रँड्सचा अवलंब करते, जे प्लास्टिकचे रिसायकलिंग करून ही उत्पादने बनवतात. हे लहान, सातत्यपूर्ण प्रयत्न पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करण्यासोबत आपल्याला आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी देखील देतात. शाश्वतता नीरस नसली पाहिजे, तर उत्साही, वैयक्तिक आणि अधिक अर्थपूर्ण असू शकते. यंदा इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे निमित्त एका वेळी एक पुनर्वापरयोग्य पिशवीचा वापर करत आपल्या भूमातेची काळजी घेण्याचा संकल्प करूया.”