no images were found
मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी धीरज रुकडे
कोल्हापूर (प्रतिनिधी): – पुणे येथे सिंबायोसिस कॉलेज मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार संघाचा Nation First कार्यक्रम पार पडला.यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सिंबायोसिस चे संस्थापक मुजुमदार सर तसेच विविध वृत्तपत्राचे संपादक उपस्थित होते. तसेच विविध जिल्ह्यातून पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आदर्श पत्रकार पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. तसेच भारतीय सैन्यात योगदान दिलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला. संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी विशेष प्रयत्न करून सदरचा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी धीरज रुकडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे शहर संघटक सागर शेरखाने, गारगोटी तालुका प्रमुख सविता माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.