Home Uncategorized सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

34 second read
0
0
90

no images were found

सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            सांगली : आमदार अनिल बाबर विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे लोकप्रतिनिधी होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो हे दाखवून देणारे ते आदर्श लोकप्रतिनिधी होते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

            खानापूर – आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पश: आजाराने सांगली येथील खासगी रुग्णालयात आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर तालुक्यातील गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन पंचांग 2027’ मराठी ॲपचे लोकार्पण !

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभहस्ते दसर्‍याच्या शुभ…