no images were found
लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला पाया अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत.
एकीकडे राज्यामध्ये भाजपचे मिशन ४५ सुरु असताना पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे केंद्रीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाही पुण्यात आले. नुकतीच संघाची राष्ट्रीय बैठक पुणे शहरात झाली. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
पुणे शहरामध्ये लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुणे विमानतळावरील विस्तारित नवीन टर्मिनल ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. विमानतळाची नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी पतंप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येणार आहेत.